आपली स्टोरी आपोआप घडत नसते..ती घडवावी लागते..’ आजवर न घडलेली गोष्ट सांगणाऱ्या ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस

अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेटभेट’ या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा हा ट्रेलर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं तेव्हाच त्याविषयीची उत्सुकता वाढली होती. … Read more

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची एंट्री! साकारणार ‘मोनिका कामत’

तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दिवसेंदिवस खूपच गाजतेय. TRP च्या बाबतीत म्हटलं तर ही मालिका नेहमीच टॉप ५ मध्ये असते. या मालिकेचे चाहतेही खूपच आहेत. या मालिकेतील मल्हार, वैदेही, मोनिका, स्वराज आणि पिहू या पात्रांना प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली. या मालिकेत आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेची मंजुळा म्हणून … Read more

अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेता रोहित परशुराम आणि पूजा आव्हाड यांना कन्यारत्न प्राप्ती!

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता रोहित परशुराम याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. या मालिकेत अर्जुन ची भूमिका तो साकारतोय. या मालिकेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. रोहित आणि पूजा यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. याची माहिती रोहितने सोशल मीडिया द्वारे दिली आहे. … Read more

शेतकरीच नवरा हवा या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप या कारणामुळे मालिका झाली लवकरच बंद

शेतकरीच नवरा हवा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील सया आणि रेवा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सया हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि रेवा ही मोठी बिजनेस वूमन. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सर्व अडथळे पार करत अखेर त्यांचं लग्न झालं. संपूर्ण गावाला त्रास देणाऱ्या काकीसाहेबाना देखील तिने तुरुंगाची … Read more

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना IGF च्या UK-India Awards मध्ये “UK-India Relations मध्ये आजीवन पुरस्कार प्रदान !

प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या वार्षिक UK-इंडिया अवॉर्ड्समध्ये यूके-इंडिया रिलेशनमध्ये जीवनभर योगदानासाठी प्रतिष्ठित इंडिया ग्लोबल फोरमच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. UK-India Awards चा सर्वात मोठा मानला जाणारा हा सन्मान शेखर कपूर यांना प्रदान करण्यात आला. निर्माते शेखर कपूर यांना त्यांच्या कामगिरी साठी हा खास सन्मान देण्यात आला आहे. … Read more

अभिनेता सोनू सूद ने केली नेहा धुपियाला मदत !

इंडस्ट्रीत सगळेच कलाकार एकमेकांना मदत करताना आपण बघतोच पण सोनू सूद ने अभिनेत्री नेहा धूपिया ला एक खास मदत केली आणि नेहा ने सोनू चे आभार मानले आहेत. अभिनेत्री नेहा धुपीया तिच्या कुटुबीयां सोबत प्रवास करत असताना तिची इंडिगो फ्लाईट लेट झाली या बद्दल तिने एक ट्विट केलं आणि या ट्विट वर सोनू ने रिप्लाय … Read more

अभिनेता राजकुमार रावच्या अभिनय प्रवासाला मिळाला परफॉर्मर ऑफ द इयर चा पुरस्कार !

बॉलीवूडमधील पॉवरहाऊस टॅलेंट म्हणजे राजकुमार राव ! याला नुकत्याच झालेल्या ग्रॅझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी हा खास पुरस्कार त्याला देण्यात आला. 2010 मध्ये राजकुमार राव ने त्याच इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि तेव्हा पासून आपर्यंत राजकुमार रावने आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्याने साकारलेल्या … Read more

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणच्या छोट्या परीचे पार पडले बारसे! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेता रामचरण आणि उपासना बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहेत. त्यांच्या घरी एक छोट्याश्या परीचे आगमन झाले आहे. 20 जूनला उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला होता. या बातमीनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. टॉलीवुड आणि बॉलीवुड मधील कलाकारांनी या जोडप्याला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. उपासनाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर खुप गर्दी केली … Read more

‘अफलातून’साठी जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र

चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर, आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया केली आहे. ‘अ डिफेक्टीव्ह कॅामेडी; असं म्हणत ‘अफलातून’ हा … Read more

दंगल ते स्टारडम अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने पटकावला अजून एक पुरस्कार

अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने अजून एक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे तिच्या एक दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकिर्दीत तिने नुकताच 40 अंडर 40 साठी प्रतिष्ठित प्रेरणादायी अभिनेत्री हा पुरस्कार मिळवला. हा प्रतिष्ठित पुरस्कार अव्वल 40 तरुण उद्योजक, नेत्यांच्या उत्कृष्टतेची ओळख, प्रोत्साहन आणि सन्मान करतो 40 वर्षांखालील नवसंशोधक, मनोरंजन, क्रीडा, फॅशन आणि तंत्रज्ञानापासून रिटेल, शिक्षण आणि आरोग्यसेवा या … Read more

Exit mobile version