दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणच्या छोट्या परीचे पार पडले बारसे! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेता रामचरण आणि उपासना बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहेत. त्यांच्या घरी एक छोट्याश्या परीचे आगमन झाले आहे. 20 जूनला उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला होता. या बातमीनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. टॉलीवुड आणि बॉलीवुड मधील कलाकारांनी या जोडप्याला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. उपासनाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर खुप गर्दी केली होती. बाळ आणि आई वडील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता.

आज 30 जूनला उपासना आणि रामचरण यांच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. याची माहिती उपासना, रामचरण आणि चिरंजीवी यांनी सोशल मीडिया द्वारे सांगितली आहे. मुलीचे नाव खूपच सुंदर आहे. मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडिला असे आहे. नामकरण सोहळ्याचे फोटो पोस्ट करत नामकरणाची माहिती उपासनाने सांगितली आहे. हे नाव ऐकूण प्रेक्षकांना आश्चर्यही वाटेल, कारण नाव खुप मोठे आहे. हे नाव आम्ही ललिथा सहस्त्रनाम नमम मधून घेतले आहे, असे उपासना आणि रामचरण यांनी सांगितले आहे. एका वेगळ्या उर्जेतून वेगळ्या प्रकाशाकडे जाणे आणि स्वताची वेगळी वाट तयार करत बदल करणे असा त्या नावाचा अर्थ आहे.

नामकरण सोहळ्याचे BTS उपासनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. नामकरण सोहळा हा शाही नामकरण सोहळ्यासारखा पार पडणार आहे. त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बरेच सेलेब्रिटी नामकरण सोहळ्याला सहभागी होणार आहेत. तुम्हाला उपासना आणि रामचरण यांच्या मुलीचे नाव कशे वाटले? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version