अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेता रोहित परशुराम आणि पूजा आव्हाड यांना कन्यारत्न प्राप्ती!

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता रोहित परशुराम याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. या मालिकेत अर्जुन ची भूमिका तो साकारतोय. या मालिकेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. रोहित आणि पूजा यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. याची माहिती रोहितने सोशल मीडिया द्वारे दिली आहे. Blessed With a Baby Girl अशी माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.

परशुराम कुटुंबात एक लक्ष्मीचे आगमन झाल्याने सगळेच खुश आहेत. रोहित आणि पूजा यांना त्यांच्या चाहत्यांनी आणि बऱ्याच कलाकारांनी खुप शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोहितने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे विडियो शेअर केले होते. ते दोघे आई बाबा होणार आहेत, ही बातमी त्याने त्याच्या चाहत्यांना दिली होती. रोहित त्याचे अन पूजाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. लग्नाच्या 6 वर्षानंतर त्या दोघांना आई बाबा होण्याचं सुख मिळालय.

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेअगोदर रोहितने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. फुलाला सुगंध मातीचा, ज्ञानेश्वर माऊली, क्रिमीनल्स, रघु ३०५, आरं बा, मिथुन अशा मालिका आणि चिटपटांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिकांबरोबर त्याने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. राम सिया के लवकुश, देवी आदि पराशक्ती या हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.

रोहितची बायको पूजा आव्हाड ही एक मॉडेल आहे. तिने मॉडेलिंग मध्ये तिचे करियर केले आहे. तिने अनेक स्पर्धेत भाग घेतला असून बरीच पारितोषके आपल्या नावी केली आहेत. mrs. india worldwild च्या फायनल पर्यंत ती पोहचली होती. ही स्पर्धा २०१८ मध्ये पार पडली होती.

सध्या रोहित आणि पूजा यांच्या आयुष्यात एक चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्या दोघांना आणि छोट्या प्रिन्सेसला खुप साऱ्या शुभेच्छा!

Leave a Comment

Exit mobile version