तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची एंट्री! साकारणार ‘मोनिका कामत’

तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दिवसेंदिवस खूपच गाजतेय. TRP च्या बाबतीत म्हटलं तर ही मालिका नेहमीच टॉप ५ मध्ये असते. या मालिकेचे चाहतेही खूपच आहेत. या मालिकेतील मल्हार, वैदेही, मोनिका, स्वराज आणि पिहू या पात्रांना प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली. या मालिकेत आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेची मंजुळा म्हणून एंट्री झाली आहे. यामुळे मालिका खुपच मनोरंजक ठरली आहे.

या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेने मोनिका नावाची भूमिका साकारली आहे. तिचे हे नकारात्मक पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. या मालिकेत प्रिया मराठेच्या जागी बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मोनिका नावाची भूमिका साकारणार आहे. कालच्या एपिसोड मध्ये तेजस्विनीची एंट्री झाली. या मालिकेचा एक एपिसोड ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेजस्विनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

आतापर्यंत आपण तेजस्विनीला सोज्वळ भूमिका करतांना पाहिले आहे. पहिल्यांदाच आपण तिला निगेटिव भूमिकेत पाहणार आहोत. तेजस्विनीने बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभाग घेतला होता. हाताच्या दुखापतीमुळे ती घराबाहेर गेली. या सीजनची विनर तीच होईल असे सर्वांना वाटत होते.

अभिनेत्री प्रिया मराठेने ही मालिका का सोडली? याचे कारण तिने स्वतः स्टार प्रवाहवर सोशल मीडिया द्वारे सांगितले आहे. प्रियाची तब्यत सध्या बरी नाही. तिच्या हेल्थ इश्यू मुळे तिला ही मालिका सोडावी लागली. प्रियाने प्रेक्षकांचे खुप आभार मानले. मोनिका या पात्राला तुम्ही जे प्रेम दिलं तसंच यापुढेही द्या. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही भूमिका साकारणार आहे, असे प्रियाने म्हटले आहे. जसे प्रेम तुम्ही मला दिलत, तसे प्रेम तेजस्विनीला द्या. मी छोटासा ब्रेक घेतेय, मी पुन्हा एका नव्या भूमिकेत तुमच्या भेटीला येईल. असे प्रियाने म्हटले आहे.

तेजस्विनी लोणारी सध्या तिचा आगामी चित्रपट अफलातूनचे प्रमोशन करत आहे.आजच या चित्रपटाचा ट्रेलर आजच लॉंच झाला आहे. आज तेजस्विनीने सोशल मीडियाद्वारे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन तुमच्यासाठी सीक्रेट आहे असे सांगितले आहे. तिला मोनिका या पात्राबद्दल बोलायचे होते, पण ती या भूमिके साठी अद्याप गप्पच आहे. तुम्हाला तेजस्विनीची मोनिका कामत नावाची भूमिका कशी वाटली? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version