दंगल ते स्टारडम अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने पटकावला अजून एक पुरस्कार

अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने अजून एक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे तिच्या एक दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकिर्दीत तिने नुकताच 40 अंडर 40 साठी प्रतिष्ठित प्रेरणादायी अभिनेत्री हा पुरस्कार मिळवला. हा प्रतिष्ठित पुरस्कार अव्वल 40 तरुण उद्योजक, नेत्यांच्या उत्कृष्टतेची ओळख, प्रोत्साहन आणि सन्मान करतो 40 वर्षांखालील नवसंशोधक, मनोरंजन, क्रीडा, फॅशन आणि तंत्रज्ञानापासून रिटेल, शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांतील अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात येत.

2016 मध्ये दंगल या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सान्या मल्होत्राचा हिंदी चित्रपसृष्टीत पदार्पण झाल. तिचा हा प्रवास इथून सुरू झाला. तेव्हापासून तिच्या या सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात होऊन आज ती इथवर पोहचली आहे. अत्यंत कमी कालावधीत सान्या ने स्वतःच अनोखं स्थान निर्माण केलं आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून एक उदयास आली. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये बधाई हो, फोटोग्राफ, लुडो, मीनाक्षी सुंदरेश्वर आणि पग्ग्लैट यासारखे उत्तम सिनेमे आहेत.

अभिनेत्री सान्या मल्होत्रा भविष्यात अनेक नवीन प्रोजेक्ट मधून दिसणार आहे. कथलमधील एका पोलिसाच्या नुकत्याच साकारलेल्या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रेम मिळाले आहे.जवान या आगामी चित्रपटात ती दिग्गज शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार असून सान्या बहुप्रतिक्षित सॅम बहादूर या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. द ग्रेट इंडियन किचनचा हिंदी रिमेक मिसेस मध्ये पुन्हा एकदा ती बघायला मिळणार आहे.

Leave a Comment

Exit mobile version