अभिनेत्री राधा सागरच्या मुलाचे पार पडले बारशे ! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेत्री राधा सागर तिच्या अभिनयामुळे ओळखली जात आहे. तिच्या उत्तम अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राधा सागरने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, तो आता २ महिन्यांचा आहे. राधा सागरने तिच्या मुलाचे नाव ठेवले आहे. नुकतेच तिच्या मुलाचे बारसे पार पडले असून, त्याचे नाव वीर असे आहे. बाळाचं बारसं खुप थाटामाटात पार पडले आहे. … Read more

कन्यादान मालिकेतील ऑनस्क्रीन कपलचा साखरपुडा संपन्न! मालिकेच्या सेटवर झालं प्रेम.

मराठी मनोरंजनविश्वात बरेच कपल विवाह बंधनात अडकताना दिसले आहे. काही जणांनी साखरपुडा देखील उरकला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाह झाला आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशीष कुलकर्णी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. तसेच अभिनेत्री पूजा सावंतने देखील गुपचुप साखरपुडा उरकला आहे. आता आणखी एक ऑनस्क्रीन जोडी लग्न बंधनात अडकणार आहे. सन … Read more

We Are Engaged! म्हणत पूजा सावंतने उरकला गुपचुप साखरपुडा .

अभिनेत्री पूजा सावंत ही एक मराठी सिनेसृष्टीतिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अभिनय प्रेक्षकांना फारच आवडते. तिचा चाहता वर्ग देखील नेहमी तिच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. सध्या सोशल मीडियावर पूजाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. we … Read more

अंकिता लोखंडेच्या चाहत्यांनी बिग बॉस 17 च्या वादात ऑनलाईन ट्रोल्स विरुद्ध केला तिचा बचाव!

सध्याच्या सोशल मीडिया च्या विश्वात कौतुक आणि टीका दोन्ही होते आणि असच काहीस अंकिता च्या बाबतीत घडलं आहे. अंकिता लोखंडेचे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बिग बॉस 17 च्या घरात तिची वागणूक आणि वागणुकीवर लक्ष्य करणार्‍या ऑनलाइन ट्रोल्सविरूद्ध तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला. जिथे ती तिचा पती विकी जैन सोबत दिसत … Read more

ठिपक्यांची रांगोळी मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! ज्ञानदा रामतीर्थकरने शेअर केली भावुक पोस्ट.

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका गेल्या २ वर्षापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. स्टार प्रवाहवरील मालिका चांगले कथानक असून देखील बंद होतात, तसेच नवनवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. २० नोव्हेंबर पासून लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. परंतु … Read more

कोण ठरणार ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचे मानकरी?

महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाल्यापासून या पुरस्कारांसाठी मराठी सिनेसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली असून सगळ्या विभागात कमालीची चुरस आहे. परिक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा कौल ध्यानात घेत विजेते ठरणार आहेत. तुमच्या आवडत्या कलाकाराला कुठल्या कॅटगरीत नॉमिनेशन … Read more

अजिंक्य आणि ऋतुजाची जोडी पुन्हा जमली!

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी ‘सोंग्या’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. एका नाटकाच्या निमित्ताने या दोघांनी एकत्र काम केलं होतं, पण त्यांनतर एकत्र काम करण्याचा तो योग जुळून आला नाही. आता मात्र ‘सोंग्या’ या आगामी … Read more

स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये २५ वर्षांच्या लीपसोबत येणार धडाकेबाज वळण!

स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे. शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा … Read more

११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार!

कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार ह्या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली. याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न … Read more

कायदा फक्त साहेबाचाच! ‘सन मराठी’ वरील ‘सुंदरी’ मध्ये वनिता खरात दिसणार ‘साहेब’ या खलनायिकेच्या भूमिकेत

वनिता खरात हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहचलं आहे. प्रेक्षकांना पोटधरुन हसायला लावणारी अभिनेत्री वनिता खरात, आता प्रेक्षकांच्या मनात दरारा निर्माण करेल की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण वनिता खरातला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अर्थात, ती या भूमिकेमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेईलच. ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील … Read more

Exit mobile version