We Are Engaged! म्हणत पूजा सावंतने उरकला गुपचुप साखरपुडा .

अभिनेत्री पूजा सावंत ही एक मराठी सिनेसृष्टीतिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अभिनय प्रेक्षकांना फारच आवडते. तिचा चाहता वर्ग देखील नेहमी तिच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. सध्या सोशल मीडियावर पूजाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. we are engaged म्हणत तिने प्रियकरासोबत सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये तिचा होणारा नवरा दिसत असून, तिच्या बोटातील अंगठी देखील दिसत आहे. मात्र तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा फोटोमध्ये ओळखू येत नव्हता. तिचा प्रियकर कोण असेल? तो काय करतो? याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

आता या गोष्टीला पूर्णविराम लागला आहे. तिने आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिच्या नवऱ्याचा चेहरा दिसत असून, त्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. पूजाच्या पोस्टला सिद्धार्थ चांदेकरने कमेन्ट करत ‘ अँड द डिझ्नी फिल्म बिगिन्स ‘ असे लिहिले होते. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तो परदेशात राहतो, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून, आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरू करत आहोत. we are engaged म्हणत तिने पोस्ट शेअर केल्या आहेत. पूजाने तीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला कमेन्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा आणि सिद्धेशची जोडी तुम्हाला आवडली का? तुम्ही पूजा आणि सिद्धेशच्या लग्नासाठी उत्सुक आहात का ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version