जीव झाला येडा पिसा मालिकेचा येणार हिंदी रीमेक

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून अजूनही ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. जी पण मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे त्या मालिकेचा रीमेक आपल्याला आजकाल पाहायला मिळत आहेत. तसंच जीव झाला येडापिसा या मालिकेसोबत होताना दिसत आहे. या मालिकेचा देखील रीमेक आपल्याला आत्ता हिंदी मध्ये पाहायला मिळणार आहे.

कलर्स चॅनलवर २२ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता बावरा दिल ही मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या हिंदी मालिकेचा पोस्टर देखील जीव झाला येडापिसा मालिकेसारखाच आहे. जीव झाला येडापिसा या मराठी मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे या मालिकेचा रीमेक बनवण्यात येत आहे. तर मित्रांनो बावरा दिल ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Jeev Zaya Yedapisa serial hindi remake bawara dil

Leave a Comment

Exit mobile version