अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पहिल्यांदाच शेयर केला बाळाचा फोटो

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने २८ जानेवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितली. तेव्हा सर्व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. २८ फेब्रुवारी रोजी बाळाला १ महिना पूर्ण झाल्यानिमित्त तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धनश्री खूपच खुश दिसत आहे. लहानपणी बाळाचे फोटो शेयर करायचे नसतात. म्हणून तिने बाळाचा चेहरा अजूनही दाखवला नाही.

धनश्री सोशल मीडिया वर खूपच अॅक्टिव असते. ती आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी चाहत्यासोबत शेयर करत असते. गरोदर असल्याची बातमी देखील तिने एकदम हटक्या पद्धतीने दिली होती. आत्ता तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून आत्ता ती खूपच खुश आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला atoz मराठी टीम कडून खूप खूप शुभेच्छा!

Tags: Dhanashri Kadgavkar post her baby photo first time, dhanashri kadgavkar baby photo, dhanashri kadgavkar kid photo, dhanashri kadgaonkar mulga, dhanashri kadgaonkar new born baby photo

Leave a Comment

Exit mobile version