माझ्या नवऱ्याची बायको मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिणीवरी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच समजत आहे. या मालिकेचा विशेष असा एक चहातावर्ग होता. ही मालिका नेहमीच trp च्या यादीत अव्वल स्थानावर राहिली आहे. परंतु अलीकडच्या काही दिवसांत या मालिकेने वेगळाच ट्रॅक पकडला होता, जो चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे मालिकेची trp खूपच घसरली होती आणि त्यामुळेच निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेतील गुरु, शनाया आणि राधिकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आत्ता या मालिकेच्या ठिकाणी घेतला वसा टाकू नको हा नवीन शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा शो पौराणिक कथेवर आधारित आहे. याचा प्रोमो देखील आपण पहिलाच असेल. यामध्ये पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

२०१६ मध्ये सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको मालिका येत्या ७ मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं होतं. तर मित्रांनो माझ्या नवऱ्याची मालिका बंद व्हावी की नाही यावर तुमच काय मत आहे ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Mazhya Navryachi Bayko Serial end

Leave a Comment

Exit mobile version