हा अभिनेता साकारणार सोहम – बबड्याची भूमिका

झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासुबाई ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्या ठिकाणी अग्गबाई सुनबाई ही नवीन मालिका सुरू होणार आहे. ही मालिका अग्गबाई सासूबाई या मालिकेचा दूसरा सीजन आहे ज्यामध्ये आत्ता आपल्याला या मालिकेत काही पात्र बदललेले दिसणार आहेत.

नुकताच प्रदर्शित झालेला अग्गबाई सुनबाई मालिकेचा प्रोमो पाहता आपल्याला अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते गिरीश ओक या मालिकेत असल्याच कळतं. पण या मालिकेत आत्ता शुभ्रा साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या ऐवजी आपल्याला स्वामिनी फेम अभिनेत्री उमा पेंढारकर दिसणार आहे. या प्रोमो मध्ये शुभ्राच्या हातात आपल्याला तिचं बाळ देखील दिसत आहे. पहिला सीजन जसा सासू म्हणजेच आसावरीवर होता तसंच आत्ता हा नवीन सीजन सुनेवर म्हणजेच शुभ्रावर असणार आहे.

परंतु या मालिकेत आत्ता आपल्याला नवीन बबड्या पाहायला मिळणार की जुनाच बबड्या पाहायला मिळणार याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. काही मीडिया रिपोर्टस नुसार या नवीन मालिकेत आपल्याला नवीन बबड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पूर्वी अभिनेता आशुतोष पतकी सोहम हे पात्र साकारत होता. परंतु नवीन मालिकेत आपल्याला अभिनेता अद्वैत दादरकर सोहम हे पात्र साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेता अद्वैत दादरकर याने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील काम केले आहे. तर मित्रांनो तुम्ही नवीन सोहम ला पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Aggabai Sasubai New babadya

Leave a Comment

Exit mobile version