दख्खन चा राजा ज्योतिबा मालिका होणार बंद

मागील वर्षी लॉकडाउन मद्धे बऱ्याच मालिका बंद पडून त्याजागेवर नविन मालिका सुरू झाल्या. त्याचप्रमाणे यावर्षीच्या सुरू असलेल्या लॉकडाउन मद्धे स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’  ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. याची माहिती दिलीये ते या मालिकेतील ज्योतिबा ची भूमिका सकारणारा अभिनेता विशाल निकम याने विशाल म्हणाला की, जन्म झाला की मृत्यू ठरलेला असतो! पण म्हणून कुणी जगण सोडत न्हाई! ज्योतिबा एकच सांगतो .. सुरवात झाली हाय .. शेवट करायचा की न्हाई आपण ठरवायच ..! एकत्र व्हतो .. एकत्र राहु ! भेटू .. जगलोय त्ये लढाया .. मराया नव्ह .  ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका बंद करण्यात आली आहे . तुम्ही दिलेलं प्रेम असच  पुढेही राहुद्या , लवकरच भेटू. ज्योतिबाच्या नावानं चांगभल . अश्या प्रकारे मालिका बंद झाल्याची माहिती विशालने दिली आहे. मालिका बंद झाल्यामुळे या मालिकेचे सर्व चाहते नाराज झाले आहेत.

 तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कॉमेंट्स मद्धे नक्की कळवा.

Leave a Comment

Exit mobile version