मुलगी झाली हो मालिकेच शूटिंग सुरू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन भाग

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्यामुळे शुटींग थांबण्यात आले होते. आणि आता मालिकेच शुटींग पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे. मालिकेचे नविन भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील रोहन म्हणजेच सृजन देशपांडेने सहकलाकारांनसोबतचा फोटो शेअर करत on the way to navsari as कॅप्शन दिल आहे.

या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना करोनाची लागण झाली ,आर्या म्हणजेच श्वेता आंबिकर हिच्या वडिलांचे निधन झाले यानंतर मालिकेतील शौनक म्हणजेच अभिनेता योगेश सोहोनीला चोरांनी पुणे नाशिक हायवेवर आडवून पन्नास हजार रुपये लुटले . अशा अनेक संकटांचा सामना करत मुलगी झाली हो या मालिकेची टीम गुजरात मधील नवसारी येथे शुटींग करण्यास सज्ज झाली आहे.

 तर तुम्हाला मुलगी झाली हो ही मालिका आवडते का , नविन भाग पाहण्यासाठी उत्सुक आहात हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.   

Leave a Comment

Exit mobile version