आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांच कोरोना मुळे निधन

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडिल प्रदीप कुमार हे ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी स्वराज्य रक्षक संभाजी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली, कारण अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शिवकन्या राणूअक्कांची भूमिका साकारली होती. अश्विनीचे वडील देखील अभिनेते आणि दिग्दर्शक होते . त्यांनी अनेक नाटकांच दिग्दर्शन केलय. त्याचबरोबर सामाजिक कार्यांमध्ये देखील त्यांचा मोलाचा वाट होता. प्रदीप कुमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे ते भोर मधल्या हॉस्पिटल मद्धे उपचार घेत होते . पण या उपचारांना अपयश येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर भोर येथेच अंत्यसंस्कार झाले .

 A to Z मराठी कडून प्रदीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजलि तसेच महांगडे परिवाराला या दु:खातुन बाहेर पडण्याची शक्ति मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

Leave a Comment

Exit mobile version