आश्विनी महंगाडे ने वडिलांच्या जाण्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे करोना मुळे निधन झाले. हेच दुख: व्यक्त करत अश्विनीने इनस्टाग्राम वर एक दुख्:द पोस्ट शेअर केली आहे . ज्यात तिने म्हंटल आहे, “करोनाने घात केला ,माझा आधारवड हरपला . कधी कधी स्वत:चे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस वाघासारखे करोनाशी लढले पण अखेरीस ही झुंज उपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही केले नाही तर आपले आयुष्य निरर्थक . नाना माझ्या यशाचं गुपित ,माझ्या लढण्याचे बळ , माझे मार्गदर्शक , माझी ताकद , माझा पाठीराखा ,माझा बापमाणुस.  अशाच प्रकारे वडिलांच्या आठवणीत अश्विनीने ही पोस्ट शेअर केली आहे.    

Leave a Comment

Exit mobile version