पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई सुभेदार चित्रपटाची जोरदार घोडदौड!

हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे … Read more

अभिनेत्री अक्षया देवधरची पहिली मंगळागौर! मंगळागौर मेहंदीची खास झलक केली शेअर!

अभिनेत्री अक्षया देवधरचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातिल मंगळागौर हा स्त्रीच्या आनंदाचा क्षण असतो. अक्षया देवधरची ही पहिली मंगळागौर आहे. तिची मंगळागौरची जोरदार तयारी चालू आहे. तिने सोशल मीडियावर मंगळागौरच्या मेहंदीचा खास विडियो देखील शेअर केला आहे. पाहुयात मेहंदीची खास … Read more

कलर्स मराठीवरील “रमा राघव” मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग! बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन…

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेत येत्या मंगळवारी २९ ऑगस्ट आणि बुधवारी ३० ऑगस्टला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या यंदाच्या रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे, ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच रमा राघव ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे विशेष चर्चेत आहे. अत्यंत स्वार्थी … Read more

निर्मात्या आफीफा नाडियाडवाला यांनी गौरी सावंतचा ‘ताली’मधील उल्लेखनीय प्रवास एक्सप्लोर केला!

गौरी सावंत या भारतातील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि HIV/AIDS ग्रस्त लोकांच्या जीवनात बदल घडवत असताना तिच्या प्रभावी प्रवासाने सुष्मिता सेन अभिनीत 2023 च्या वेब-सीरिज “ताली” मध्ये एक अनोखं स्थान मिळवले. या कथाकथनाच्या विजयामागे एक दूरदर्शी चित्रपट निर्माती आफीफा नाडियाडवाला यांचे अनोखं नातं आहे. 2019 मध्ये आफीफा नाडियाडवालाला गौरी सावंत सापडली आणि तिच्या … Read more

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार !

बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. एका अंतर्गत सूत्रानुसार ” या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र … Read more

बापल्योक १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन! मराठी सिनेसृष्टीत शोककळा!

कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला असून, आज आणखी एका अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचे आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० :४५ वाजता निधन झाले आहे. मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झाले होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच मिलिंद सफई यांनी … Read more

” सोनू सूद ने घडवला एक तरुण पायलट “

बॉलीवूडचा मसिहा सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. वैमानिक होण्याचे त्याचे स्वप्न साकार करून त्याने एका माणसाचे जीवन कसे बदलून टाकले ही गोष्ट बघुया ! एक मुलगा जो एव्हिएशन अकादमीमध्ये पायलट म्हणून ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे आणि हे फक्त सोनू सूदच्या प्रयत्ना मुळे शक्य झालं. गरिबीत … Read more

मर्दानी फ्रँचाईझी ही सर्व मर्यादा मोडून काढणारी आहे – राणी मुखर्जी!

भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या नावाजलेल्या कलाकारांपैकी एक राणी मुखर्जी ही दमदार व्यक्तीरेखेचा समावेश असलेली फ्रँचाईझी आपल्या नावावर असलेली एकमेव अभिनेत्री आहे. मर्दानी या ब्लॉकबस्टर फ्रँचाईझीमध्ये राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. राणी म्हणाली, ‘मर्दानी फ्रँचाईझीचा मला खूप अभिमान वाटतो. एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिकेतून स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा … Read more

यासाठी पाहावा ‘सुभेदार… गड आला पण…’

शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘सुभेदार… गड आला पण…’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा … Read more

Exit mobile version