बापल्योक १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे … Read more

‘बापल्योक’ शुक्रवारी भेटीला!

‘नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद … Read more

वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट ‘बापल्योक’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गीत ट्रेंडिंगला

बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन … Read more

‘बापल्योक’ मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव!

अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी नेहमीच प्रतिथयश कलाकारांसोबत नवोदितांनाही आपल्या चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर ब्रेक देण्याचं काम केलं आहे. यापैकी अनेक नावारूपाला आले तर काही पुढे सुपरस्टारही झाले. आज मराठी सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांनीही नेहमीच रॅा टॅलंटचा शोध घेऊन गाव-खेड्यांतील कलाकारांसाठी झगमगत्या चंदेरी दुनियेचं द्वार खुलं केलं आहे. नागराज आणि मकरंद यांच्या … Read more

‘बापल्योक’ साठी नागराज मंजुळे आणि मकरंद माने आले एकत्र!

आपल्या सशक्त कलाकृतींतून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन मातब्बर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र … Read more

Exit mobile version