चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे ला कन्यारत्न प्राप्त

झी मराठी वरील चला हवा येउद्या  हा कार्यक्रम प्रेक्षकांच नेहमीच मनोरंजन करीत आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकार खूप लोकप्रिय आहे. भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके , नीलेश साबळे ही तर लोकप्रिय आहेच पण सध्या एक चेहरा पण जास्त लोकप्रिय होतोय तो अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे . आपल्या उंचीचा जराही न्युनगंड न मनात बाळगता अभिनय क्षेत्रात उतरून लोकप्रिय ही झाला.

नुकतच त्याच्या घरी चिमुकलीच आगमन झालं आहे. “कालच्या दिवशी मि नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो.” असं कॅप्शन देत त्याने ट्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. ही बातमी अंकुरने शेअर केल्यावर त्याच्यावर त्याच्या चाहत्यांचा वर्षावच पडला . 

Leave a Comment

Exit mobile version