दुनियादारी सिनेमाला आज 10 वर्षे पूर्ण! सईने रेट्रो अंदाजात फोटो केले शेअर!

संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच विक्रम रचले होते. दुनियादारी चित्रपटाची 10 वर्षे सेलिब्रेट करत या चित्रपटाची टीम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पोहचली होती.

हा चित्रपट 19 जुलै 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटाने एक वेगळेच स्थान प्रेक्षकांच्या मनात केले आहे. सई ताम्हणकरने या चित्रपटात शिरीन नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, उर्मिला कोठारे, सई ताम्हणकर, रिचा परीयाली हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. कलाकार आणि त्यांचे उत्तम अभिनय, आणि त्यांची पात्रे यामुळे दुनियादारी हा चित्रपट खूपच गाजला होता.

अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर रेट्रो लूकमध्ये खास फोटो शेअर केले आहेत. तिने या चित्रपटातील सर्वच कलाकार आणि टीमसोबत फोटो पोस्ट केले आहेत. स्वतःचे सोलो फोटो शेअर करत ‘An Ode To Dniyadari!’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

या चित्रपटातील जिंदगी, टिक टिक वाजते, यारा यारा, देवा तुझ्या गाभाऱ्याला ही गाणी खुप गाजली होती. स्वप्नील जोशीने साकारलेली श्रेयस आणि सईने साकारलेली शिरीन भूमिका खूपच गाजली. श्रेयस आणि शिरीन या जोडीला प्रेक्षक आजही पसंती देतात.

Leave a Comment

Exit mobile version