अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या प्रसिद्ध गायकासोबत लवकरच अडकणार विवाह बंधनात!

मराठी मनोरंजन विश्वात बरेच कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. काहीजण आपल्या नात्याचा खुलासा करतात. सोशल मीडिया द्वारे प्रेमाची कबुली देतात. नुकतेच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता आणखी एक कलाकाराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. स्वानंदी टिकेकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी खुलासा केला आहे. ही आनंदाची बातमी कळताच स्वानंदीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

स्वानंदीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आशिष कुलकर्णी असे आहे. फोटो शेअर करत This is Us!असे कॅप्शन तिने लिहिले असून, #love #amchatharla असे हॅशटॅग तिने वापरले आहे. कलाकारांनी आणि चाहत्यांनी आशीष आणि स्वानंदी यांना खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वानंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? आशिष हा एक गायक आणि संगीतकार आहे. त्याने इंडियन आयडॉल 12 व्या सीजनमध्ये भाग घेतला होता. यामुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. तो स्वतःचे लाईव शोज देखील करतो. अनेक गाणी त्याने गायली आहेत.

स्वानंदी एक चांगली अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? या मालिकेत झळकली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने निरोप घेतला. स्वानंदी आणि आशिष दोघेही गाणे गात असल्याने त्यांच्या प्रेमाचा धागा जोडला आहे, असा अंदाज देखील आपण लावू शकतो. स्वानंदी सोनी मराठीवरील सिंगिंग स्टार या रीयालिटि शोची विजेती होती.

स्वानंदी आणि आशीष लग्नबंधनात कधी अडकणार? याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. तुम्हाला स्वानंदी आणि आशीषची जोडी आवडली का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version