सैराट फेम अरबाज शेख गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करून करतोय मोलाचं कार्य

जेव्हापासून सर्वत्र लॉक डाउन सुरु झालं आहे तेव्हापासून गरिबांचे खूप हाल चालू झाले आहेत. कामकाज बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खूप सारे मराठी कलाकार पुढे येऊन गरिबांसाठी सढळ हाताने मदत करत आहेत.

त्यातच सैराट मध्ये सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख देखील मागे राहिलेला नाही. तो लॉक डाउन मध्ये सोलापूर जिल्हयातील करमाळा येथील गरजू कुटुंबाना अन्नधान्य वाटप करत आहे. गरिबांची होत असलेली उपासमार पाहून आपण गोरगरिबांना अन्नधान्य पुरवलं पाहिजे असा त्याने निर्णय घेतला आणि तो गरजूना अन्नधान्य देऊन मोलाचं काम करत आहे.

अरबाज शेख याने सैराट या चित्रपटात परश्याचा मित्र सल्याची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक देखील झालं होत.

Tags: Sairat fame arbaj shaikh helping poor family, sairat

Leave a Comment

Exit mobile version