महेश कोठारे यांच्या चार पिढ्या एकत्र!

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील एक काळ गाजवला. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने देखील मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. आदिनाथ कोठारे आत्ता ८३ या बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून हा चित्रपट १९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित आहे.

आदिनाथ कोठारे याची बायको उर्मिला कोठारे हि देखील मराठी सिने जगतातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु आत्ता ती जिजाच्या जन्मापासून सिने सृष्टीपासून लांबच आहे. उर्मिला आणि आदिनाथ आपल्या मुलीचे फोटो आणि विडिओ नेहमी आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर शेअर करत असतात.

महेश कोठारे यांची आई आणि वडील यांनी आत्ता नव्वदी पार केली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वानी मिळून महेश कोठारे यांच्या आईचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या ४ पिढ्या एकाच फोटोत दिसत आहेत. हा फोटो अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर शेअर केल्यानंतर या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्स चा वर्षाव होत आहे.

Tags: Mahesh Kothare Family, Urmila Kothare Family, Adinath Kothare Family, Jijah Kothare

Leave a Comment

Exit mobile version