झी मराठी घेऊन येत आहे दोन नव्याकोऱ्या मालिका

लॉकडाउन मुळे सर्व मालिकांचे शूटिंग बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळे खूप दिवसांपासून प्रेक्षकांना जुन्या मालिका दाखवल्या जात आहेत. परंतु आत्ता सरकारने हळूहळू सर्व मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंग चालू करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका लवकरच चालू होणार आहेत.

परंतु आत्ता झी मराठी वर अजून दोन नवीन मालिका येणार आहेत. टोटल हुबलाक आणि एक गाव भुताचा या मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोणत्या मालिकांच्या जागी या मालिका येणार आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. टोटल हुबलाक या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेत राहुल मगदूम, महेश जाधव आणि अमरनाथ खराडे हे देखील आपल्याला दिसणार आहे. यापूर्वी हे कलाकार आपल्याला प्रसिद्ध मालिका लागीर झालं जी मध्ये दिसले होते. आत्ता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

त्याशिवाय दुसरी मालिका एक गाव भुताचा या मालिकेच्या प्रोमोमध्ये वैभव मांगले दिसत आहे. त्यामुळे या मालिकेत अजून कोण कोणते कलाकार आहेत हे स्पष्ट झालेले नाही. परंतु या मालिकेच्या नावावरून तर हि मालिका भुतांवर आधारित आहे असं वाटत आहे. तर मित्रानो झी मराठीवरील टोटल हुबलाक आणि एक गाव भुताचा या नव्या कोऱ्या मालिका पाहण्यासाठी तुम्हाला आवडेल का ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Tags: total hublak, total hublak serial, total hublak new zee marathi serial, total hublak cast, total hublak starting date, ek gav bhutacha serial, ek gav bhutacha, ek gav bhutacha serial, ek gav bhutacha serial cast

Leave a Comment

Exit mobile version