रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाचा रीयल लाइफ नवरा पहा

रेश्मा शिंदे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध असं नाव . रेश्मा हि मूळची मुंबईची असून तिचा जन्म २७ मार्च  १९८७ रोजी झाला. रेश्मा लहानाची मोठी सुद्धा मुंबई मधेच झाली. तिने आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केलं आणि याच दरम्यान तिला अभिनयाचं वेड लागलं आणि यामुळेच कि काय २०१० मध्ये तिने पहिल्यांदाच महाराष्ट्राचा सुपरस्टार या मराठी रिऍलिटी शो मध्ये आपलं नशीब आजमवलं आणि या शो नंतर तिने खूप साऱ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.

त्यानंतर रेश्मा ने २०११ मध्ये ‘बंध रेशमाचे’ या मालिकेमधून डेब्यू केला आणि  हि मालिका तब्बल एक वर्षापर्यंत  चालली. रेशमाने स्टार प्रवाह वाहिनीवरील बंध रेशमाचे आणि झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्यभरे आणि लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकांमध्ये मध्ये अगदी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिची लगोरी मैत्री रिटर्न या मालिकेतील पूर्वा हि भूमिका विशेष गाजली. 

२०१२ मध्ये रेश्मा शिंदेचा विवाह अभिजीत चौगुले बरोबर झाला. अभिजीत हा पेशाने एक सिविल इंजिनीअर आहे. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वरील मालिकेत ती आत्ता एका सावळ्या मुलीची भूमिका साकारत आहे. रंगाने सावळ्या असलेल्या मुलींना समाजात कशा प्रकारे हिनवले जाते आणि काही लोक त्याची कशी चेष्टा उडवतात हे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

Tags: Reshma Shinde Husband, Reshma Shinde Marriage Photo, Reshma Shinde Real life husband, Reshma Shinde Wedding Photo, Reshma Shinde Husband Name

Leave a Comment

Exit mobile version