‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये पुन्हा एकदा नवीन एंट्री होणार आहे. या मालिकेत आपल्याला काहीना काही नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री होणार असून, ती आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. मालिकेत इशाच्या साखरपुड्या दिवशी आशुतोषच्या बहिणीची एंट्री होणार आहे. आशुतोषच्या बहिणीचे नाव वीणा असे आहे. वीणाच्या आल्याने मालिकेचा पूर्ण ट्रॅक बदलणार आहे. मालिकेत वीणाची एंट्री  अनिरुद्धची बिजनेस पार्टनर म्हणून असणार आहे. अनिरुद्धची बिजनेस पार्टनर असल्याने ती अरुंधती आणि आशुतोष यांच्या आयुष्यात नवे वादळ निर्माण करते की नाही, हे पाहणे आता एक वेगळीच गोष्ट आहे.

गेले कित्येक दिवस वीणाच्या येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर वीणा सर्वांसमोर आली. तसेच प्रेक्षकांची आतुरता संपली. वीणा दुसरी कोणी नसून आपली लाडकी अभिनेत्री खुशबू तावडे आहे. खुशबू गेली कित्येक वर्षांपासून मराठी मालिकेत काम करत आहे. तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. तिने आम्ही दोघी, तेरे बिन आणि मेरे साई या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘आम्ही दोघी’ या मालिकेत खुशबूने मीरा नावाची भूमिका साकारली होती. तसेच हिंदी मालिका ‘तेरे बिन’ मध्ये  तिने नंदिनी ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती. सध्या खुशबू ‘मेरे साई’ या मालिकेत काम करत आहे. आता ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आशुतोषच्या भूमिकेत दिसणार आहे.

खुशबू ही एक उत्तम अभिनेत्री असून तिची बहीण तितिक्षा तावडे ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. तितिक्षा सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ता मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर खुशबूचा नवरा अभिनेता संग्राम साळवी याने ‘देवयानी’ या मालिकेतून खुप प्रसिद्धी मिळवली होती. तो सध्या ‘कन्यादान’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. त्यांना एक गोंडस मुलगा आहे.

खुशबूला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. वीणा नावाचं पात्र तुम्हाला सकारात्मक की नकारात्मक भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडेल? 

Leave a Comment

Exit mobile version