अभिनेते देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनपासून चित्रपटगृहात

लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात देवदत्तने हनुमानाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या १६ जूनपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्त म्हणतो, हनुमानाची भूमिका मिळणं हे मारूतीरायाचंच श्रेय आहे. ही भूमिका माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे, असे देवदत्तने सांगितले. हा चित्रपट  रामायणावर आधारित  असल्याने सोशल मीडिया वर खुप चर्चेत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. टीजर हा खुप धम्माकेदार आणि हीट आहे. ‘रामायण’ वर आधारित या चित्रपटाचा टीजर पाहून प्रेक्षकांना खुप काही नवे पाहायला मिळाले. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभासने रामाची भूमिका, अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका, अभिनेत्री कृती सेननने सीताची भूमिका, तसेच अभिनेता सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका साकारलेली आहे.

अभिनेता देवदत्त नागेने अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्येही काम केले आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील त्याची खंडोबाची भूमिका अविस्मरणीय आहे. या भूमिकेसाठी त्याला अवॉर्ड देखील मिळाले होते. त्याबरोबर त्याने देवयानी, जीव माझा गुंतला या मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तान्हाजी, सत्यमेव जयते, वीर शिवाजी अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. देवदत्त हा एक खुप चांगला आणि लोकप्रिय अभिनेता आहे.

देवदत्तने आतापर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये तसेच बॉलीवुड मध्ये देखील काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. तो पहिल्यांदाच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास बरोबर काम करत आहे. तो साऊथ मध्ये पहिल्यांदाच काम करत आहे. देवदत्तचे फॅन्स आणि सर्व प्रेक्षक देवदत्तच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत आपण हनुमानाच्या भूमिकेत अभिनेते धारा सिंग यांना पाहिले होते. देवदत्तला पहिल्यांदाच हनुमानाच्या भूमिकेत पाहणार आहोत.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.  

Leave a Comment

Exit mobile version