बालकलाकार मायरा वायकुळ ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत साकारणार भूमिका

कलर्सवर ‘नीरजा’ ही हिंदी नवी मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहता मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्नेहा वाघ आणि माझी तुझी रेशीमगाठ फेम परी म्हणजेच मायरा वायकुळ दिसणार आहेत. मायराने ‘नीरजा’ ही भूमिका साकारली आहे. ‘परी’ हे घराघरात पोहचलेलं पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे होते. यश, नेहा आणि परी हे त्रिकूट आजपण सर्वांना आठवते. खुप कमी कालावधीत माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला  प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली होती. लवकरच या मालिकेने निरोप सुद्धा घेतला. मायराचा चाहता वर्ग असून प्रेक्षकांना तिला काम करताना पाहायला आवडते.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर मायरा सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांशी जोडली गेली आहे. याशिवाय १५ मे पासून, लहान तोंडी मोठा घास या चला हवा येवू द्या च्या लहान मुलांसाठी असणाऱ्या कार्यक्रमात मायरा झळकणार आहे.

कलर्सवरील हिंदी मालिका नीरजाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, नीरजाला म्हणजेच मायराला घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. मायराला घराबाहेर पडण्याची खुप इच्छा असते, पण तिची आई अभिनेत्री स्नेहा वाघ काही कारणामुळे तिला घराबाहेर जाऊ देत नाही. यात तिच्या आईचा नाईलाज असतो. या मागचे खरे कारण काय हे मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांना कळेल. मालिका कधी सुरू होईल? या मालिकेचा वेळ काय असेल? अद्याप काहीही या मालिकेविषयी माहिती नाही.

मालिकेचा प्रोमो पाहता यामध्ये मायराचा लुक खुप बदललेला आहे. आपण तिला छोटे केस आणि फ्रॉकमध्ये पाहिले होते. नीरजा ही भूमिका साकारताना पंजाबी सूट, लांब केस आणि पायात मोजडी असा मायराचा लुक असणार आहे. नव्या लुक मध्ये मायराला पाहण्यासाठी प्रेक्षक खुप आतुरले आहेत.

मायराच्या नव्या प्रोजेक्टसाठी तिला बऱ्याच कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेहा वाघ आणि मायरा या दोघी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असल्याने, या दोघींना एकत्र काम करताना पाहून त्यांचे चाहते आनंदी होतील.

मायराची ‘नीरजा’ ही हिंदी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version