अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा संपन्न, लवकरच विवाह बंधनात अडकणार

बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाची स्पर्धक सई लोकूर हिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव तीर्थदीप रॉय असे आहे. सईने अगोदर पोस्ट केलेल्या फोटो मध्ये तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटोस ती आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. सोसिअल मीडियाद्वारे सईने आपली एंगेजमेंट झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. साखरपुड्याचे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सई तिचे लग्न ठरल्यापासून ते सगळ्या गोष्टी सोशिअल मेडिया वर शेअर करत आहे. 

अभिनेत्री सई लोकुरणे तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो पोस्ट करून तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिली होती. काही दिवसापूर्वी सईने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत फोटो शेयर केला होता आणि आत्ता तिचा साखरपुडा झाल्याच सांगून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा लपवल्यामुळे चाहते तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते.  

Sai Lokur Engagement Photo

Tags: Sai Lokur Engagement Photo, Sai Lokur Husband, Sai Lokur Wedding, Sai Lokur Husband News, Sai Lokur Marriage

Leave a Comment

Exit mobile version