रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता बद्दल बरंच काही

Title: Anagha Bhagare Biography, Wiki, Birthday, Age, Family, Parents, Husband, Boyfriend, Movies, Serials

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेचे कथानक अतिशय रंजकदार वळणावर येऊन पोहचले आहे. मालिकेतील दीपाची बहीण श्वेता हि व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अनघा भगरे हिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

झी मराठवरील राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिसणारे प्रसिद्ध ज्योतिष  अतुल भगरे हे अनघाचे वडील आहेत.  अनघाचा जन्म २४ जुन १९९४ रोजी नाशिकमध्ये झाला. तिचे शालेय शिक्षण CEO मेरि हायस्कूल मधून पूर्ण झाले असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील SNDT कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. तिने Mass Communication मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अनघाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. काॅलेज मध्ये असताना छोट्या मोठ्या एकांकिकामध्ये ती सहभागी व्हायची. अनघाचे अजून लग्न झालेले नसून ती सिंगलच आहे. 

झी मराठीवरील दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तिने काम केले होते. अनघाने अनन्या या नाटकात सहायक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिने ‘अनन्या’ या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका हे व्यक्तिरेखा अत्यंत उत्तम रीतीने साकारली होती.  अनघाने अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनघाने महेश कोठारे यांच्या कोठारे विजन मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे. तिने व्हाट्सअप लग्न, कुलकर्णी vs कुलकर्णी या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 

आत्ता ती रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची बहीण श्वेताची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत श्वेता हे पात्र Negative दाखवण्यात आले आहे. श्वेता नेहमी दीपाला त्रास देण्याचे काम करत असते. तर मित्रांनो रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता ची भूमिका तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Anagha Bhagare Biography, Anagha Bhagare Wiki, Anagha Bhagare Birthday, Anagha Bhagare Age, Anagha Bhagare Husband, Anaghaa Bhagare, Anagha Bhagare Qualification

Leave a Comment

Exit mobile version