या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीला गावकऱ्यांनी टाकल वाळीत !

कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ फेम मिताली म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. पुंडलिक भोसले हे तिच्या सासऱ्यांचे नाव. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भाऊक अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यात ११ मे तिच्या सासऱ्यांचे करोनामुळे निधन झाले त्याआधी तिचे पती राहुल भोसले यांना करोनाची लागण झालेली पण त्यांनी करोनावर मात केली. मात्र तिच्या सासऱ्यांचे निधन झाले. सासरे गेल्यावर बाकी सगळ्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह येऊन पण गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकल आहे. सासऱ्यांच्या कार्याला देखील कोणी पुजारी पुढे आला नाही. हा सगळा अनुभव वैशालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  अभिनेत्री वैशाली भोसले हिला आपण चंद्र आहे साक्षीला , लक्ष्य , तु माझा सांगाती, बंध रेशमाचे , या मालिकेंमध्ये पहिले आहे.

तर वैशालीच्या या भाऊक पोस्टवर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .   

Leave a Comment

Exit mobile version