अभिनेता विराजस कुलकर्णी खरंच विवाह बंधनात अडकला?

झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणारा अभिनेता विराजस कुलकर्णी अवघ्या काही काळातच प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. विराजसला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ते आपल्याला त्याने स्वतः सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर त्याचा आणखी एक फोटो समोर आला आणि सोशल मीडिया वर व्हायरल झाला. त्या फोटोत विराजसने डोक्याला बाशिंग बांधल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. फोटो पाहून विराजसचे लग्न झाल्याचे काहींना वाटत आहे. मात्र हा फोटो विराजसच्या रियल लग्नाचा नसून रील लग्नाचा आहे. मालिकेत लवकरच विराजसच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

मालिकेतल्या त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आदित्य कश्यप असं असून, त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृन्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीवारील सारे तुझ्याच साठी ह्या मालिकेत काम केले होते. तर विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले आहे. माझा होशील ना … या मालिकेत विराजस आणि गौतमी सोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.  

Title: Virajas Kulkarni wedding, Virajas kulkarni marriage, virajas kulkarni reel life marriage

Leave a Comment

Exit mobile version