अभिनेत्री सई लोकुरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू!

सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहोचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरुवात तिची आई वीणा लोकुर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती.

सई लोकुर सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव असते. लग्न ठरल्यापासून ते सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्तेक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा इवेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणाऱ्या जोडीदारसह तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. नुकताच सईचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे फोटो तिने इंस्टाग्राम शेअर केले होते. तसेच आता तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात ती कुणाची तरी वाट पाहत असल्याचे तिने म्हटले आहे.

सई लोकुरने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, कुणाच्या तरी येण्याची वाट पाहतेय. असे म्हणत तिने तिचा भावी पती तीर्थदीप रॉयला टॅग केले आहे. या व्हीडीओत सईने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस नेसला असून यात ती गोल गोल फिरत आहे. यावेळी ती खूप आनंदी दिसत आहे.

सई लोकुरने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची डिजिटल पत्रिका इंस्टाग्रामवर शेअर केली होती. यात तिने संपूर्ण सोहळ्याची रूपरेषा सांगितली आहे. २७ नोव्हेंबेरला सकाळी १० वाजता देवकार्य, २८ नोव्हेंबेरला संध्याकाळी ६.३० वाजता मेहंदी, २९ नोव्हेंबेरला ११ वाजता हळद आणि संध्याकाळी ६.३० वाजता सीमंत पूजन आणि संगीत आणि ३० नोव्हेंबेर ला सकाळी लग्न पार पडणार आहे.     

Title: Bigg Boss Marathi fame Sai Lokur Marriage preparations

Leave a Comment

Exit mobile version