विराजस आणि शिवानी रिलेशनशिप असल्याच्या चर्चा

आत्ताच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत हजेरी लावली होती. सिद्धार्थ आणि मिताली नंतर सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी जोडी ठरली ती म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांची. सध्या शिवानी रांगोळे स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून अभिनेता विराजस कुलकर्णी झी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

शिवानी आणि विराजस यांचे खूप सारे एकत्र फोटो तर आपण पाहिलेच आहेत. परंतु सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नात या दोघांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा विराजस आणि शिवानी हे रिलेशनशिप मध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चाहते देखील कमेन्ट करून तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात का असे अनेक प्रश्न विचारत आहेत.

सध्या तरी शिवानी आणि विराजस यांनी त्यांच्यातील नात्याचा अजून कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु चाहत्यांनी मात्र ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला आहे. शिवानीला त्यांच्या नात्याविषयी विचारले असता ती म्हणते की “विराजस आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते. परंतु चाहते ज्या पद्धतीने आमच्या नात्याविषयी चर्चा करत आहेत ते ऐकून मला खूप मजा येते.”

तर मित्रांनो शिवानी आणि विराजस हे खरंच रिलेशनशिप मध्ये आहेत का? त्यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेन्ट करून नक्की सांगा!

Tags: VIrajas Kulkarni and Shivani Rangole in relationship, Virajas kulkarni and Shivani Rangole, Virajas Kulkarni and Shivani Rangole lovestory, Virajas Kulkarni girlfriend, Shivani Rangole Boyfriend

Leave a Comment

Exit mobile version