अस्ताद काळे याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे या कारणामुळे झाले होते निधन

अभिनेता अस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. मराठी बिग बॉस मधून त्यांची लवस्टोरी जगासमोर आली आणि त्या दोघांनीही प्रेमाची कबुली दिली.

पण तुम्हाला महित आहे का, अस्तादचे स्वप्नालीच्या आधी एका मुलीवर जिवापाड प्रेम प्रेम होते पण तिचे काही वर्षापूर्वी निधन झाले. अस्तादने त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरवात केली ती अग्निहोत्र ह्या मालिकेतून, या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भुमिकेत दिसली होती. खऱ्या आयुष्यातही त्यांना प्रेम होऊन दोघे एकत्र आले. त्यांच्या रिलेशनबद्दल सगळ्यांनाच महित होते. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. तिचे निधन होऊन ५ वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे.

नंतर अस्ताद आणि स्वप्नालीने पुढचं पाऊल ह्या मालिकेत एकत्र काम केले या दोघांची मैत्री होऊन त्याच रूपांतर नंतर प्रेमात झालं. आता त्यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या फॅन्सना उत्सुकता लागली आहे.  

Tags: Aastad Kale first girlfriend prachi mate, aastad kale and prachi mate lovestory

Leave a Comment

Exit mobile version