अभिनेत्री पूर्णिमा डे ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत झळकणार

लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले भाग ३’ नुकतीचं चालू झाली असुन या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता माधव अभ्यंकर उर्फ अण्णा नाईक आणि अपूर्वा नेमळेकर उर्फ शेवंता हे भाग ३ साठी तर तयारच आहेत आणि आता ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सॉनिया म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे देखील या मालिकेत झळकणार आहे.

पूर्णिमा या मालिकेत सुषमाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेची शूटिंग सावंतवाडी येथे चालू असुन लवकरच पूर्णिमा आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे . या मालिकेत पूर्णिमाला नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे. या आधीच्या भागात सुषमाची व्यक्तिरेखा अभिनेत्री रुतुजा धर्माधिकारी साकारत होती आणि आता पूर्णिमाने यात कसा अभिनय केला आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 रात्रीस खेळ चाले भाग ३ अधिकच विचार करायला लावणारा ठरणार आहे कारण यात अण्णा नाईक यांचा वाडा आणि कुटुंब पुर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे रात्रीस खेळ चाले भाग ३ चे येणारे एपिसोड पाहणं हे नक्कीच मनोरंजक असेल.     

Leave a Comment

Exit mobile version