अभिनेता सिद्धार्थ खिरीड बद्दल बरच काही

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘मुलगी झाली हो ‘ ही मालिका’ प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरत आहे. या मालिकेबरोबरच प्रेक्षक या मालिकेतील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करतायत. ज्या प्रमाणे शौनक आणि माऊची जोडी प्रेक्षकांना आवडते तसेच आता माऊ आणि ACP सिद्धांत भोसलेची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान करत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच त्याची एंट्री झाली आहे तरी त्याने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा मुळचा पुण्याचा आहे . त्याचा जन्म २८ जून १९९० मद्धे पुण्यात झाला. त्याने त्याच कॉलेजच शिक्षण ब्रिहान महाराष्ट्र कॉलेज मधून घेतल असुन , पुणे university मधून त्याने त्याचं ग्रॅजुएशन पुर्ण केलय . सिद्धार्थ हा अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो एक उत्तम डान्सर देखील आहे. तो सोशल मीडिया वर त्याचे dance परफॉर्मेंस चे व्हिडिओ नेहमी टाकत असतो.

२०१८ मद्धे झी मराठी वरील ‘जाडूबाई जोरात’ या मालिकेद्वारे त्याने कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने झी युवा वरील ‘फ्रेशर्स’ आणि सोनी मराठी वरील ‘एक होती राजकन्या’ या मालिकेंमद्धे कामं केली होती. ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत देखील त्याने पोलीसाची भूमिका साकारली होती. आणि आता तो आपल्याला मुलगी झाली हो मालिकेत ACP सिद्धांत भोसले साकारताना दिसत आहे.

तर तुम्हांला माऊ आणि शौनक ची जोडी आवडते की सिद्धांत आणि माऊ ची जोडी आवडते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version