टोटल हुबलाक मालिका लवकरच येत आहे तुमच्या भेटीला – Total Hublak Serial

झी मराठी वाहिनीवर लवकरच नवीन मालिका येणार आहे. वाघोबा प्रोडक्शन प्रस्तुत टोटल हुबलाक या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करण्याआधी अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांनी आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थोड्या वेळासाठी आश्चर्याचा धक्काच बसला होता.

सर्वजण त्यांचं लग्न झालं आहे म्हणून शुभेच्छा देखील देत होते. परंतु काही वेळातच हे लग्न नसून टोटल हुबलाक या मालिकेचेहे प्रोमोशन असल्याचं समजलं. किरण गायकवाड याने यापूर्वी लागीर झालं जी या सुप्रसिद्ध मालिकेत भैय्यासाहेबांची भूमिका साकारली होती. लागीर झालं जी या मालिकेमुळेच किरण गायकवाड याला खरी ओळख मिळाली. प्रेक्षक अजूनही भैय्यासाहेबाना विसरले नाहीत.

अभिनेत्री मोनालिसा बागल हिने यापूर्वी प्रेम संकट, ड्राय डे, झाला बोभाटा यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय या मालिकेत राहुल मगदूम, महेश जाधव, अमरनाथ खराडे हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी हे सर्व कलाकार लागीर झालं जी या मालिकेत देखील झळकले होते. या मालिकेचे दिग्दर्शन तेजपाल वाघ करणार आहेत.

टोटल हुबलाक हि मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. तर मित्रानो  राहुल्या, टॅलेंट, जम्या आणि भैयासाहेब हे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहेत. तर तुम्ही ह्या मालिकेसाठी आणि  भैया, जम्या, टॅलेंट, आणि राहुल्या याना पुन्हा एकत्र पाहायला उत्सुक आहात कि नाही ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Tags: total hublak, total hublak new serial, total hublak serial cast, total hublak new serial, total hublak serial starting date, टोटल हुबलाक

Leave a Comment

Exit mobile version