‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानची दमदार एन्ट्री

मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ‘होणार सुन मी ह्या घरची ’आणि ‘अग्ग्बाई सासुबाई’ यांसारख्या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान. तेजश्री अग्गबाई सासुबाई या मालिकेनंतर छोट्या पडद्यापासुन दूर होती. मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

स्टार प्रवाह वरील सगळ्यांची आवडती आणि trp मध्ये नेहमीच अव्वल असणारी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत आता तेजश्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तिची दमदार एन्ट्री होणार आहे. बऱ्याच दिवसाच्या ब्रेक नंतर तेजश्री छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तेजश्रीची एन्ट्री मालिकेत कोणता नविन ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे. तेजश्री या मालिकेत कोणती भूमिका साकारणार? ती भूमिका निगेटिव्ह असणार की आणखी काही याकडे सध्या चाहत्यांच लक्ष लागलय.

तर तुम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधानला फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.    

Leave a Comment

Exit mobile version