तारक मेहता का उलट चष्मा मालिकेतील अमित भट्ट यांनी मागितली माफी!

Taarak Mehta ka Oolta Chashma fame Amit Bhatt Apologies to Marathi People and MNS

सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांची चांगलीच आवडती मालिका आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असते. नुकताच या मालिकेच्या प्रसारित झालेल्या एका भागामुळे ही मालिका वादात सापडली आहे. या भागामध्ये गोकुळधामचे सदस्य एकमेकांशी मातृभाषेवरून वाद घालताना दिसले. हा मातृभाषेवरून सुरू झालेला वाद अखेर चंपक चाचांनी थांबविला. ‘ आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी ‘ असे बोलून चंपक चाचांनी हा वाद मिटवला. परंतु या सगळ्यात चंपक चाचांनी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख केला आहे. मालिकेत हा वाद थांबला खरा पण यावरून बाहेर आता एक दुसरा वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या प्रसारित झालेल्या या भागावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसेने देखील यावर आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणा-या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,’असे अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

या आक्रमक पवित्र्याने मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर माफी मागितली. तसेच मालिकेतील चंपक चाचांची भूमिका साकारणारे अमित भटने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.

Tags: Taarak Mehta ka oolta chashma controversy, taarak mehta ka oolta chashma fame amit bhatt apologies to mns

Leave a Comment

Exit mobile version