अभिनेत्री साई ताम्हणकरचा पाय फ्रॅक्चर, तरीही शूटिंग चालूच!

मराठीत सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये देखील आपला ठसा उमटवत आहे. नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘धुरळा’ हा मराठी चित्रपट सर्वत्र गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

आता या मराठी चित्रपटानंतर सई ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘मिमी’ हा हिंदी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर आधारित असून या चित्रपटाच शूटिंग सध्या राजस्थान मधील मांडवामध्ये सुरू आहे. मिमी या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करणार असून या हिंदी चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला.

Sai Tamhankar Leg Injury

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सई चा पाय फ्रॅक्चर झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच शूटिंग आटोपल्यानंतर सई ताम्हणकर हॉटेलवर परतत आसताना सईचा पाय मुरगळला आणि तिच्या पायाला दुखापत झाली आहे. सईचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आल आहे. पाय फ्रॅक्चर असतानाही शूटिंग मध्ये अडथळा येऊ नये म्हणून सईने चित्रपटाचं शूटिंग सुरू ठेवल आहे. सेटवर तिची काळजी घेतली जात आहे.

Title: Sai Tamhankar Leg injury during Mimi Movie Shoot

Leave a Comment

Exit mobile version