स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद होणार असल्यामुळे अमोल कोल्हे भावुक

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१८ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला.  दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत रंजक असणार आहे.

या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा उत्तम रीतीने साकारली आहे तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने येसुबाईंची भूमिका साकारली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अगदी अल्पावधीतच या मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हि मालिका नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर राहिली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका या आठवड्यात पहिल्या नंबरवर आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मालिकेचा अखेरचा भाग पार पडणार असून आता या मालिकेची जागा नवीन कोणती मालिका घेणार हे अजून गुपीत आहे. नुकताच अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला ‘एक प्रवास कधीच न विसरता येणारा…’ असे कॅपशन दिले आहे.

Title: Swarajya Rakshak Sambhaji Serial to off air soon

Tags: Swarajya Rakshak Sambhaji off air, Swarajya Rakshak Sambhaji end, Swarajya Rakshak Sambhaji serial off air, Swarajya Rakshak Sambhaji serial end

Leave a Comment

Exit mobile version