गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुहृद वार्डेकर विवाहबंधनात अडकला!

छोट्या पडद्यावरील अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. सुहृदने त्याच्या लग्नातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच पुण्यातील प्राची खडतकर सोबत लग्न बंधनात अडकला. हा लग्न सोहळा अमरावतीमध्ये मोठ्या थाटात पार पडला. अमरावतीमध्ये त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग झाल असून हळदी आणि लग्न समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या सोहळ्यात अभिनेता संग्राम समेळ, अमित खेडेकर, अभिनेत्री रश्मी आनपटसह अनेक सहकलाकारांनी हजेरी लावली होती.

सुहृद वार्डेकर मूळचा नागपूरचा आहे. त्याने सुरूवातीला एका रेडिओ जाॅकी आणि साउंड इंजिनिअर म्हणून रेडिओ सिटी मध्ये काम केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्याचा गोव्याच्या किनार्‍यावर एक म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बम ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सुहृदने ‘एक घर मंतरलेले’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ यांसारख्या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारून घराघरांत पोहचला. सुहृद लवकरच आता मल्हार गणेश दिग्दर्शित ‘दाह’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Title: Suhrud Wardekar Destination Wedding

Suhrud Wardekar Marriage / Wedding Photo

Tags: Suhrud Wardekar Wedding, Suhrud Wardekar Destination Wedding, Suhrud Wardekar Marriage, Suhrud Wardekar Wife, Suhrud Wardekar Engagement, Suhrud Wardekar Lagn

Leave a Comment

Exit mobile version