सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीची बहीण देखील आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे . या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत . या मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे. माधवी निमकरची मावस बहीण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच नाव आहे अभिनेत्री सोनाली खरे. माधवी निमकर या क्षेत्रात आली ती तिच्या मावस बहीण  अभिनेत्री सोनाली खरेमुळे . कारण सोनालीच्या शूटिंगवेळी माधवी देखील तिच्यासोबत शुटींगला जायची . इथूनच तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.

 २००९ मध्ये ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटातून माधवीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक मराठी चित्रपटांमद्धे कामं केली आहेत. तसेच ती आपल्याला अनेक लोकप्रिय मालिकेंमध्ये दिसून आली. सध्या तिने शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. माधवीच्या मावसबहिणी बद्दल म्हणजेच अभिनेत्री सोनाली खरेबद्दल सांगायच झाल तर तिने सावरखेड एक गाव , चेकमेट , स्माइल प्लीज , तेरे लिए अशा अनेक चित्रपटांमद्धे काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता बिजय आनंद याच्याशी लग्न केले आहे. अभिनेता बिजय आनंद हा देखील लोकप्रिय अभिनेता आहे.

 तर तुम्हांला या बहीणींची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version