या मराठी मालिकांच शूटिंग पुन्हा एकदा गोव्यातून गुजरात मध्ये हलवण्यात येणार

गोवा सरकारने राज्यात टीव्ही शुटींग आणि चित्रपटांसाठी परवानगी रद्द केल्यामुळे अनेक टीव्ही कार्यक्रमांना त्यांचे शूटिंगची ठिकाणे दुसऱ्या राज्यात हलविणे भाग पडले आहे. आता लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ? आणि मुलगी झाली हो या मालिकेंचे सेट आता गुजरात मध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 सुख म्हणजे नक्की काय असत ? या टीमच्या एक स्त्रोत्याने सांगितल की, “आम्ही आता गुजरातच्या दिशेने जात आहोत . संपूर्ण टीमने सिल्वासा येथे जाण्याचा निर्णय घेतला. पण हे पुर्ण टीमसाठी कठीण आहे. त्यात आता मुंबई ते गोवा आणि गोवा ते गुजरात शुटींग हलवणं हे आमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्रासदायक आहे. परंतु आम्ही प्रेक्षकांच मनोरंजन थांबउन देणार नाही . आम्ही गुजरातमद्धे जाईपर्यंत प्रेक्षक गोव्यात शूट केलेल्या भागांचा आनंद घेतील.

 “मुलगी झाली हो , या टीमच्या स्त्रोत्याने सांगितले आहे की, आम्ही कालच मालिकेचा २०० भागांचा पल्ला पर केला. आत्ता जसे अडथळे येतायत तसे अनेक अडथळे आम्ही याआधी देखील पार केले आहेत . पण तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करणं थांबवल नाही. आता आम्ही सेट गुजरतला हलवत आहोत. बऱ्याच प्रयत्नांतर आणि काही अडचणींमुळे , आम्ही मुलगी झाली हो या मालिकेचे नविन भाग प्रदर्शित करणे थांबविले आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ सुरक्षित आहेत . आमच्यावर तुमचे असेच प्रेम राहुद्या.”

    तर तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं? आणि मुलगी झाली हो या मालिकेंपैकी कोणती मालिका सगळ्यात जास्त आवडते हे कॉमेंट्स करून नक्की सांगा .

Leave a Comment

Exit mobile version