अरुण गवळी हे नाव सगळ्यांनाच महित आहे. डॅडी नावाने प्रख्यात असलेले अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक खुश खबर सगळ्यांननाच दिली आहे. अक्षय आणि योगिता यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी परिचं आगमन झाले आहे.
बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षय म्हंटला की , मला इतका आनंद झाला आहे की मी तो शब्दात सांगू शकत नाही . एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी खुप उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत . आणि , आमच्या लग्नाला वर्ष पुर्ण होत असताना या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नविन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
A to Z मराठी कडून अभिनेता अक्षय आणि योगीताचे खुप खुप अभिनंदन तसेच खुप साऱ्या शुभेच्छा.