अगरबत्ती न लावता ज्यांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवली जाते असे कोण होते शंकर महाराज ?

शंकर महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले दैवी पुरुष. त्यांना त्यांच्या भक्तांनीच दैवी पुरुषाची उपमा दिली आहे. जेव्हा जेव्हा शंकर महाराजांच नाव घेतल जात तेव्हा तेव्हा प्रत्तेकाच्या मनात एकच येत की महाराजांना सिगरेट कशी चालते? इतर ठिकाणी भाविक मंदिरात मूर्तीसमोर अगरबत्ती पेटवतात तसेच महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की हे कस चालू शकत. तर या बद्दल शंकर महाराजांचे भक्त सांगतात की , महाराजांच असं म्हणण होतं की या सिगरेटच्या धुराच्या वासतून मी त्रैलोक्य भटकून येतो.

महाराज मुळचे कुठले आहेत हे कोणालाही महित नाही. पण महाराजांबद्दल ज्या कथा सांगितल्या जातात त्यात अस आहे की महाराज मुळचे नाशिक जिल्ह्यातील अंतापुर गावचे . तिथे चिमणजी नावचे एक गृहस्थ राहत होते. त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. तेव्हा त्यांच्या स्वप्नात येऊन शंकराने दृष्टांत दिला आणि सांगितल की रानात जा तिथे बाळ मिळेल. आणि हे खर झाल त्यांना रानात एक लहान मुलं सापडल त्यांनी या मुलाला आपल्या मुलाप्रमानेच सांभाळल . पण मुलगा मोठा होताच त्याने आपल्या आई वडिलांना आशीर्वाद दिला की पुत्रप्राप्ती भव आणि निघून गेला. स्वतःच्या आई वडिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देणारे शंकर महाराज अशी त्यांची कथा आहे.

१९४७ साली महाराजांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच वय १६२ असल्याचा अंदाज महाराजांचे भक्त दर्शवतात. महाराजांच्या वयाबद्दल काही मेडिकल टेस्ट देखील झाल्या त्यात त्यांच वय १५० वर्ष दाखवण्यात आलं होत.

महाराजांना सगळया भाषा येत होत्या. महाराजांचे भक्त जेव्हा यायचे तेव्हा महाराज प्रयत्तेकसोबत त्यांच्या बोलीभाषेतच बोलायचे. या सर्व गोष्टी महाराजांच्या भक्तांकडूनच समजलेल्या आहेत. पण एक मात्र खर की महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट लावलीच जाते.

Leave a Comment

Exit mobile version