रंग माझा वेगळा मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला आहे घटस्फोट

शाल्मली टोळ्ये हे मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. आपल्या उत्तम अभिनय कौशल्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाल्मली यांचा जन्म २९ ऑगस्ट रोजी झाला. शाल्मली यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यांचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय, मुंबई येथून पूर्ण झाले असून महाविद्यालयीन शिक्षण V.G वाजे कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. अभिनेत्री शाल्मली टोळ्येचे लग्न अभिनेता पियुष रानडेंसोबत झाले होते पण फार काळ दोघांची सोबत टिकली नाही. पीयूष आणि शाल्मली यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पियुषने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत दुसरे लग्न केले आहे. 

अभिनेत्री शाल्मली यांनी अभिनय क्षेत्राची सुरुवात रंगभूमी पासून केली. शाल्मली यांनी ‘एक तर्फी प्रेम’ या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘अवघाचि संसार’ हि त्यांची पहिलीच मालिका. त्यानंतर हा खेळ सावल्यांचा, या गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, मधू इथे आणि चंद्र तिथे, देवा शपथ, स्वराज्य रक्षक संभाजी, दुर्वा या मालिकेत त्यांनी अभिनय साकारला होता. दुर्वा या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘चुपके चुपके’, ‘श्री’ या हिंदी मालिकेत त्यांनी अभिनय साकारला होता. मैं हू ना या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे. शाल्मली यांना नृत्याची देखील आवड आहे. झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या डान्स रिऍलिटी शोच्या त्या स्पर्धक होत्या. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत लावण्या हि व्यक्तिरेखा साकारत आहेत.       

शाल्मली या केवळ अभिनेत्रीच नसून एक उत्तम फॅशन डिजाईनर देखील आहेत. गेली १० वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी कॉस्ट्यूम डिजाईनर म्हणून काम केले आहे. भविष्यात त्यांना स्वतःच बुटीक सुरु करण्याची इच्छा आहे.      

Copyright@atozmarathi 

Tags: Shalmali Tolye Biography, Shalmali Tolye Husband, Shalmali Tolye Wiki, Shalmali Tolye Rang Maza Vegla, Shalmali Tolye Divorce

Leave a Comment

Exit mobile version