दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत हा अभिनेता साकारणार जोतिबाची भूमिका

लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर महेश कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ज्योतिबाची कथा दाखवली जाणार आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. ज्योतिबाचा देवस्थान कोल्हापुरात आहे. या मालिकेचं शूटिंग देखील कोल्हापुरातच होणार आहे. स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी कामाला लागली आहे.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत ज्योतिबा हि प्रमुख भूमिका अभिनेता विशाल निकम साकारणार आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘साता जल्माच्या गाठी’ या या मालिकेतून विशाल निकम प्रेक्षकांसमोर आला होता. साता जल्माच्या गाठी मालिकेतील युवराज ची भूमिका साकारणारा विशाल निकम हा त्याच्या अभिनयामूळे चाहत्यांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.

Tags: Dakhkhancha Raja Jyotiba

Leave a Comment

Exit mobile version