आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर सत्य नारायणची पूजा

नुकतीच सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेचे ५० भाग पूर्ण झाले त्या निम्मिताने सेट वर पूजा करण्यात आली. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर काही फोटो शेयर करून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये 

“आई माझी काळूबाई या मालिकेचा ५० वा भाग प्रकाशित झाला त्या निमित्त्ताने मालिकेच्या सेटवर श्री सत्यनारायणाची आणि देवी काळूबाईची पूजा करण्यात आली. या पूजेमध्ये सेटवरील सर्व कलाकार अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते आणि आणि गेल्या काही दिवसात झालेली सर्व ईडा पीडा टळूदे अशी आई काळूबाई आणि श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना. रसिकहो आपल्या प्रेमामुळे या मालिकेचे पाच हजार भाग होवोत हीच प्रार्थना. पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.” असं या पोस्ट मध्ये त्यांनी लिहलं आहे.

Tag: Satya Narayan Pooja on Aai Mazi Kalubai serial set

Leave a Comment

Exit mobile version