स्टार प्रवाह वाहिनीवर सांग तू आहेस का ही नवीन मालिका लवरच येत आहे.

लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सांग तू आहेस का?’ हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि नवी मालिका ७ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो सोसिअल मीडियावर वायरल होत आहे. प्रोमोवरून तरी या मालिकेत एक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे असच वाटत आहे.  अभिनेत्री सानिया चौधरी या आधी झी युवा वाहिनीवरील ‘साजणा’ या मालिकेत भूमिका साकारताना दिसली होती. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Tags: Sang Tu Ahes Ka New Serial

Leave a Comment

Exit mobile version